तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST2021-03-18T04:20:10+5:302021-03-18T04:20:10+5:30

लोणी : राहाता तालुक्यातील लोणी येथील इरिगेशन कॅनॉलच्या परिसरात मंगळवारी (दि. १६) रात्री ८ वाजेदरम्यान अज्ञात तरुणाचा मृतदेह ...

Murder by throwing stones at the head of a young man | तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

लोणी : राहाता तालुक्यातील लोणी येथील इरिगेशन कॅनॉलच्या परिसरात मंगळवारी (दि. १६) रात्री ८ वाजेदरम्यान अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या दोन मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. हा मृतदेह अर्जुन अनिल पवार (वय २५, रा.बारागाव नांदूर, ता.राहुरी) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अर्जुन पवार याचे मित्र दीपक डोळस व विठ्ठल कावळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अनिलचा खून हा या दोघा आरोपींनीच केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. संबंधित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील करीत आहेत.

...

तीन तासात तपास

अवघ्या तीन तासात कुठलाही पुरावा नसताना गुन्ह्याचा तपास करण्यात लोणी पोलिसांना यश आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, पोलीस नाईक दीपक रोकडे, शरद पवार व इतरांनी ही कामगिरी केली.

Web Title: Murder by throwing stones at the head of a young man