शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात नाचण्याच्या जुन्या वादातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:26 IST

पाथर्डी : तालुक्यातील खेर्डे येथे दोन वर्षांपूर्वी लग्नात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर चौघांनी चाकू हल्ला ...

पाथर्डी : तालुक्यातील खेर्डे येथे दोन वर्षांपूर्वी लग्नात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर चौघांनी चाकू हल्ला करीत त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र रामकिसन जेधे (वय ३३) असे मयताचे नाव आहे.

खून केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रशांत बबन शेळके, किशोर बाबासाहेब शेळके, प्रवीण बबन शेळके, बबन जगन्नाथ शेळके (सर्व रा. खेर्डे) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण करत आहेत.

प्रशांत बबन शेळके व राजेंद्र रामकिसन जेधे यांच्यात सुमारे दोन वर्षांपूर्वी गावातील लग्नात नाचण्याच्या कारणावरून मारामारीचा प्रकार घडला होता. त्या घटनेचा राग मनात धरून शेळके व त्यांच्या साथीदारांनी शुक्रवारी राजेंद्र जेधे यांच्या घराच्या पडवीच्या बाहेर जेधे यांस पकडले. शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रशांत बबन शेळके याने धारदार चाकूने जेधे यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस वार केला. त्यानंतर जेधे यांना नातेवाइकांनी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचांरासाठी दाखल केले. मात्र, जखम गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यास नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक वाघ, सहायक पोलीस निरीक्षक कायंदे, गोपनीय विभागाचे भगवान सानप आदींनी घटनास्थळी भेट दिली.

...........

०४ राजेंद्र जेधे