किरकोळ कारणातून एकाचा खून; एक पोलिसांच्या जण ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 15:49 IST2019-10-08T15:48:58+5:302019-10-08T15:49:05+5:30

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री बालाजी देडगाव येथे तेलकुडगाव रस्त्यावर घडली. शेषराव पांडुरंग मोरे (वय ५० रा. देडगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

Murder of one for minor reasons; One policeman captured | किरकोळ कारणातून एकाचा खून; एक पोलिसांच्या जण ताब्यात 

किरकोळ कारणातून एकाचा खून; एक पोलिसांच्या जण ताब्यात 

नेवासा : तालुक्यातील बालाजी देडगाव येथे किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री बालाजी देडगाव येथे तेलकुडगाव रस्त्यावर घडली. शेषराव पांडुरंग मोरे (वय ५० रा. देडगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 
पोलीस सूत्राची माहिती अशी की, बालाजी देडगाव येथील शेषराव पाडुरंग मोरे व संभाजी उर्फ बाळू शिवाजी थोरात हे सोमवारी रात्री दारू पिले. दारू पिल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणातून बाचाबाची सुरू झाली. याच रागातून नंतर थोरात याने मोरे यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केले. यात मोरे याचा मृत्यू झाला. सदर घटना देडगाव-तेलकुडगाव रस्त्यावर घडली. दरम्यान मोरे याचा मृतदेह मोसंबी बागेत आढळला आहे. घटनेची माहिती नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा रितसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान पोलिसांनी संभाजी थोरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Murder of one for minor reasons; One policeman captured