नगर मनपा निवडणूक : हॅलो, माझ्याकडे दोन मतदार, किती पैसे देणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:06 IST2018-12-06T12:06:24+5:302018-12-06T12:06:27+5:30
मतदाराने फोन करून पैसे मागितल्याची तक्रार महापालिका निवडणुकीतील उमेदवाराने बुधवारी आचारसंहिता कक्षाकडे दाखल केली आहे़

नगर मनपा निवडणूक : हॅलो, माझ्याकडे दोन मतदार, किती पैसे देणार ?
अहमदनगर : मतदाराने फोन करून पैसे मागितल्याची तक्रार महापालिका निवडणुकीतील उमेदवाराने बुधवारी आचारसंहिता कक्षाकडे दाखल केली आहे़
प्रभाग क्रमांक 13 अ मधून संदीप अशोक भांबरकर हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत़ त्यांनी आचारसंहिता कक्षाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘माझ्या मोबाईल क्रमांकावर मंगळवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने फोन केला़ सदर व्यक्तीने माझ्याकडे दोन मतदार आहेत असे म्हणून पैशांची मागणी केली’ असे या तक्रारीत म्हटले आहे़ फोन करून पैसे मागणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून त्याच्यावर तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे़