नगर मनपा निवडणूक : सेना उमेदवाराच्या घराशेजारी पकडली दारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:10 IST2018-12-06T12:10:24+5:302018-12-06T12:10:40+5:30
महापालिका निवडणुकीनिमित्ताने शहरात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे़ बुधवारी सायंकाळी महसूल व उत्पादन शुल्कच्या पथकाने दिल्लीगेट परिसरातील बागरोजा हडको येथे छापा टाकू

नगर मनपा निवडणूक : सेना उमेदवाराच्या घराशेजारी पकडली दारु
अहमदनगर : महापालिका निवडणुकीनिमित्ताने शहरात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे़ बुधवारी सायंकाळी महसूल व उत्पादन शुल्कच्या पथकाने दिल्लीगेट परिसरातील बागरोजा हडको येथे छापा टाकून इस्त्रीच्या दुकानातून दारूचा साठा जप्त केला़ सेना उमेदवाराच्या घराशेजारी हा छापा पडल्याने खळबळ उडाली आहे.
या कारवाईत ३९ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करत तिरूपती नरसय्या नक्का याला पथकाने ताब्यात घेतले़ याबाबत निवडणूक पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या लॉण्ड्री विक्रेत्याने हा दारूसाठा कशासाठी केला होता? त्याने ही दारू कोठून आणली ? याबाबत तपासणी सुरू आहे. तपासणीनंतर या दारुचे राजकीय कनेक्शन आहे का? हे समोर येईल.