महापालिका स्थायी समिती : राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांची सभापतीपदी बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 15:30 IST2021-03-04T15:28:51+5:302021-03-04T15:30:20+5:30

अहमदनगर  : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची आज दुपारी निवड झाली.

Municipal Corporation NCP's Avinash Ghule is the chairman | महापालिका स्थायी समिती : राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांची सभापतीपदी बिनविरोध निवड

महापालिका स्थायी समिती : राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांची सभापतीपदी बिनविरोध निवड

अहमदनगर  : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची आज दुपारी निवड झाली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी अविनाश घुले व सेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी अर्ज दाखल केले होते.

सेनेचे पठारे यांनी त्यांचा अर्ज माघारी घेतला.  त्यानंतर घुले यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.

सेना नेत्यांच्या आदेशाने पठारे यांनी अर्ज माघारी घेतल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Municipal Corporation NCP's Avinash Ghule is the chairman