शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या कंत्राटी अभियंत्याला मारहाण, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

By अण्णा नवथर | Updated: April 26, 2023 20:07 IST

अभियंत्यास खड्डयात पाडून लाथाबुक्यांनी हाणले!

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: मेन लाईनवरील नळ कनेक्शन का तोडले, असे म्हणत महापालिकेच्या कंत्राटी अभियंत्यास खड्डयात पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे. ही घटना बोल्हेगाव येथील गणेश चौकात मंगळवारी ( दि. २५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. निखिल सुरशे गायकवाड ( रा. डॉनबास्को कॉलनी, सावेडी) असे मारहाण झालेल्या अभियंत्यांचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत पोपट सप्रे व त्याचा साथीदारविरोधात ( नाव माहिती) मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे कंत्राटी अभियंते गायकवाड यांच्यासह पथक मंगळवारी बोल्हेगाव येथील पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी सप्रे याने तु मेन लाईनवरील नळ कनेक्शन का तोडले. ते परत बसून दे, असे म्हणत दमदाटी केली. त्यावर अभियंते  गायकवाड यांनी मेन लाईनवर कनेक्शन देता येणार नाही. सब लाईनवर उद्या कनेक्शन जोडून देतो, असे अभियता गायकवाड हे सप्रे यास म्हणाले. त्याचा राग येऊन सप्रे व त्याच्या साथीदाराने गायकवाड यांना खड्ड्यात पाडून लाथा बुक्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका