शोकसभेत मुंडेंच्या योगदानाचा आढावा
By Admin | Updated: June 6, 2014 00:59 IST2014-06-05T23:58:11+5:302014-06-06T00:59:57+5:30
शेवगाव : शेवगाव येथे गुरुवारी आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते, दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
शोकसभेत मुंडेंच्या योगदानाचा आढावा
शेवगाव : शेवगाव येथे गुरुवारी आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते, दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
समाजातील गोरगरीब, कष्टकरी, श्रमजिवी तसेच शेतकरी अशा सर्व घटकात आपलेपणाचा विश्वास संपादन करून सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे स्व.मुंडे खर्या अर्थाने लोकनेते होते. समाजमनावर अधिराज्य गाजविणार्या त्यांच्या कार्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी वसा उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जि.प. च्या कृषी समितीचे माजी सभापती दिलीप लांडे यांनी केले.
मुंडे यांच्या जीवनचरित्रापासून शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.
अॅड. शिवाजीराव काकडे, ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णूपंत देहाडराय, भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, माजी सभापती अविनाश मगरे, शेवगाव पंचायत समितीचे उपसभापती अरुण लांडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख एकनाथ कुसळकर, तालुका प्रमुख भारत लोहकरे, एजाज काझी, बाळासाहेब सोनवणे, भाजयुवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, संजय नांगरे, बंडू रासने, कॉ. सुभाष लांडे, भगवानराव गायकवाड, भानुदास गजभीव, सालारभाई शेख, निळकंठ कराड आदी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या योगदानाचा आढावा घेतला. मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देतांना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. तालुका सरचिटणीस कचरू चोथे यांनी सूत्रसंचालन केले.
(तालुका प्रतिनिधी)