मुळा धरण ७५ टक्के भरले़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:42 IST
मुळा धरण मंगळवारी सकाळी ७५ टक्के भरले़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात आज १९ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे़ धरणावर काल रात्रीपासून पाऊस थांबल्याने आवकही घटली आहे़
मुळा धरण ७५ टक्के भरले़
राहुरी : मुळा धरण मंगळवारी सकाळी ७५ टक्के भरले़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात आज १९ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे़ धरणावर काल रात्रीपासून पाऊस थांबल्याने आवकही घटली आहे़ मुळा धरणाकडे दुपारनंतर २८२९ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती़ धरणावर पावसाने विश्रांती घेतल्याने आवक ७ हजार क्यूसेकवरून २८२९ क्यूसेकपर्यंत खाली घसरली़ धरणाचे दोन्ही कालवे बंद असल्याने धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे़ गेल्यावर्षी मुळा धरण २ आॅगस्ट रोजी ७५ टक्के भरले होते़ यंदा लाभ क्षेत्रावर पाऊस थांबल्याने धरणाच्या दोन्ही कालव्यांतून शेतीसाठी आवर्तन सोडावे लागले होते़ त्यामुळे ४ हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागले़ त्यामुळे पाण्याची पातळी खालावत चालली होती़पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभक्षेत्रावरही पावसाने विश्रांती घेतली आहे़ गेल्यावर्षी मुळा धरण भरल्याने नदीपात्रात मोºयाव्दारे पाणी सोडण्यात आले होते़ यंदाही १५ सप्टेंबरपर्यंत मुळा धरण भरण्याची आशा निर्माण झाली आहे़ सर्वदूर पाऊस पडल्याने शेती व्यवसायाला दिलासा मिळाला आहे़