मुजोर दारू विक्रेत्याला ग्रामस्थांनी चोपले; दारूचे ड्रम, बाटल्या फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 15:41 IST2020-09-26T15:40:38+5:302020-09-26T15:41:07+5:30
राहुरी तालुक्यातील वळण येथे ग्रामस्थांनी दारूबंदी केली आहे. असे असतानाही राजरोसपणे दारू विक्री करणा-यास ग्रामस्थांनी चोपले. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

मुजोर दारू विक्रेत्याला ग्रामस्थांनी चोपले; दारूचे ड्रम, बाटल्या फोडल्या
राहुरी : तालुक्यातील वळण येथे ग्रामस्थांनी दारूबंदी केली आहे. असे असतानाही राजरोसपणे दारू विक्री करणा-यास ग्रामस्थांनी चोपले. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
ग्रामस्थांनी यावेळी दारूच्या बाटल्या व ड्रम फोडले. घटनेची माहिती समजताच राहुरी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
ग्रामस्थांनी या दारू विक्रेत्यास अनेक वेळा दारू विक्री बंद करण्याची तंबी दिली होती. परंतु त्याने शनिवारी दारू विक्री बंद कर असे सांगण्यासाठी गेलेल्या तरुणांंना अरेरावीची भाषा वापरली. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी व ग्रामस्थांनी त्यास चांगलाच चोप दिला.