ऊस कामगारांचे आंदोलन सुरूच

By Admin | Updated: August 21, 2014 22:57 IST2014-08-21T21:32:18+5:302014-08-21T22:57:32+5:30

राहुरी : राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे थकीत पगार मिळण्यासाठीचे आंदोलन गुरूवारी पाचव्या दिवशीही सुरूच होते़

The movement of sugarcane workers continued | ऊस कामगारांचे आंदोलन सुरूच

ऊस कामगारांचे आंदोलन सुरूच

राहुरी : राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे थकीत पगार मिळण्यासाठीचे आंदोलन गुरूवारी पाचव्या दिवशीही सुरूच होते़ शुक्रवारी सकाळी कामगार आजी-माजी अध्यक्षांच्या घरावर व तहसील कचेरीवर मूक मोर्चा काढणार आहेत़
कामगारांचे ४० महिन्यांचे थकीत पगार मिळावेत म्हणून शुक्रवारी सकाळी ९ वाजता कामगार राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेत जमा होणार आहे़ त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे व माजी अध्यक्ष रामदास धुमाळ यांच्या घरावर मूक मोर्चा नेऊन थकीत पेमेंटची मागणी करण्यात येणार आहे़
मोर्चा राहुरी शहरातून तहसील क चेरीत जाणार आहे़ तहसीलदार राजश्री अहिरराव यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The movement of sugarcane workers continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.