शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
3
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
4
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
6
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
7
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
10
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
11
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
12
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
13
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
15
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
16
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
17
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
18
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
19
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
20
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात शिवसेनेचे आंदोलन; शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध

By शेखर पानसरे | Updated: June 12, 2023 14:31 IST

पोलिसांकडून वारकऱ्यांवर झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक आहे. याप्रकरणी दोषींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाचे संगमनेर शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली. सोमवारी (दि. १२) संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन अनेकांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेश माळवे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठार भाग तालुका प्रमुख संजय फड, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, दीपक वन्नम, वेणुगोपाल लाहोटी, शहर संघटक दीपक साळुंखे, शहर कार्याध्यक्ष अजीज मोमीन, विभाग प्रमुख विजय भागवत, संभव लोढा, युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरे, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, उपतालुकाप्रमुख जनार्दन नागरे, सागर भागवत, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजय सातपुते, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शीतल हासे, संगीता गायकवाड, आशा केदारी, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर प्रमुख योगेश बिचकर, तालुकाप्रमुख सदाशिव हासे, सुदर्शन इटप, घुलेवाडी गटप्रमुख रविंद्र गिरी, शाखाप्रमुख नितीन अनाप, संतोष कुटे, शोएब शेख, माधव फुलमाळी, मुकेश कचरे, प्रशांत खजुरे, अर्जुन आमले, राजेंद्र लोणारी, माधव अवसक, चंदू भागवत आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

शहरप्रमुख कतारी यांनी सांगितले, आम्ही शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो. काल आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या दरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरुन वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने थोडी तरी लाज बाळगावी. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी. असेही कतारी यांनी सांगितले.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर