नोकरीत स्थानिकांना डावलल्याने आंदोलन : बीव्हीजीच्या कार्यालयास टाळे ठोकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 20:02 IST2018-05-25T20:01:46+5:302018-05-25T20:02:30+5:30
साईबाबा संस्थानमध्ये ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती करताना स्थानिकांना डावलले गेल्याने संतप्त झालेल्या शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बीव्हीजी कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले. यापुढे भरती करताना स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

नोकरीत स्थानिकांना डावलल्याने आंदोलन : बीव्हीजीच्या कार्यालयास टाळे ठोकले
शिर्डी : साईबाबा संस्थानमध्ये ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती करताना स्थानिकांना डावलले गेल्याने संतप्त झालेल्या शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बीव्हीजी कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले. यापुढे भरती करताना स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात नर्स भरती करताना शिडीर्तील बेरोजगार पात्र असणा-यांनी नोकरीसाठी अर्ज केला होता़ मात्र सदर भरती करताना स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी बाहेरच्या व्यक्तींना प्राधान्य दिल्याने संतप्त झालेले शिर्डी नगरपंचायतचे नगरसेवक दत्तु कोते, नितिन कोते, रविद्र गोंदकर, नितिन शेजवळ, बबलु कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बीव्हीजीच्या कार्यालयात जाऊन उपस्थित सबंधित अधिका-यांना जाब विचारला. यावेळी या अधिका-याने अरेरावी केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. अखेर कार्यालयातील सर्वांना बाहेर काढुन टाळे ठोकण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी सांगितले की, संस्थानने संस्थानच्या रुग्णालयात नर्स भरती करण्याचे टेंडर बीव्हीजी कंपनीला दिले होते. या कंपनीने कर्मचारी भरती करताना नाशिक येथील खाजगी डाँक्टरां मार्फत मुलाखत घेऊन भरती प्रक्रिया राबविली. मात्र या भरतीत शिर्डीतील गरजवंतांनी केलेल्या अर्जाचा विचार न करता त्यांना डावलण्यात आले. अन्य ठिकाणच्या लोकांची भरती करण्यात आली. यापुर्वी या कंपनीने कर्मचारी भरती करताना शिडीर्तील तरुणांना प्राधान्य देण्याऐवजी बाहेर गावच्या तरुणांची भरती करुन घेतली. यापुढे साईबाबा संस्थानमध्ये कर्मचारी भरती करताना प्रथम प्राधान्य शिडीर्तील तरुणांना त्यानंतर शिर्डी मतदार संघातील तरुणांना नंतर बाहेर गावच्या तरुणांना संधी दयावी या प्रमाणे भरती न केल्यास भरती प्रक्रियास विरोध करुन तिव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा कोते, गोंदकर, शेजवळ यांनी दिला़ यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, तरुण,तरुणी उपस्थित होते.