शेतकऱ्यांची वीज तोडली तर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST2021-03-18T04:20:43+5:302021-03-18T04:20:43+5:30
याबाबत पक्षाचे जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे यांच्या यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी पक्षाच्या तालुकाध्यक्षा रेखा ...

शेतकऱ्यांची वीज तोडली तर आंदोलन
याबाबत पक्षाचे जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे यांच्या यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी पक्षाच्या तालुकाध्यक्षा रेखा नरवडे, उपाध्यक्ष कपिल लाटे, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा चौधरी आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांसह कामगार, कारागीर, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत महावितरणकडून वीजबिल वसुली सुरू आहे. अधिवेशन काळात सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र वीज बंद केली जात आहे. शेतात पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे वीज बंद करू नये, अन्यथा पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
फोटो १७ निवेदन
ओळी- महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज बंद करू नये, या मागणीचे निवदेन रासपेच प्रभारी नानासाहेब जुंधारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले.