मुख्याधिकाऱ्यांचे आंदोलन

By Admin | Updated: June 10, 2014 00:12 IST2014-06-09T23:14:07+5:302014-06-10T00:12:51+5:30

शिर्डी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांना बेकायदेशीरपणे अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी

Movement of the Chiefs | मुख्याधिकाऱ्यांचे आंदोलन

मुख्याधिकाऱ्यांचे आंदोलन

शिर्डी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांना बेकायदेशीरपणे अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद मुख्याधिकारी संघटनेच्या वतीने राज्यभरातील मुख्याधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले़ नगर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले़
या प्रश्नी मुख्याधिकारी संघटनेचे संघटक व शिर्डीचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी सांगितले की, खेड येथे बांधकाम सुरू असलेली इमारत पडून तीन मजुरांचा मृत्यु झाला, तर पाचजण जखमी झाले होते़ या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक मन्सुर इस्माईल नाडकर याच्या विरूद्ध पोलीसांनी फिर्याद दाखल करुन त्याला अटकही केलेली आहे़ या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी पोलिसांना संपूर्ण माहिती नगरपरिषदेने पुरवली़ मात्र ७ जून रोजी या प्रकरणी अचानक खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांना आरोपी करून अटक करण्यात आली़ त्यांना या गुन्ह्यात १२ जून पर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली़ वास्तविक ज्या इमारतीची दुर्घटना घडली त्या इमारतीला नियमानुसार बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे़
परवानगी घेतल्यानंतर नियमानुसार व योग्य गुणवत्तेचे बांधकाम करणे, तपासणी प्रमाणपत्र नगरपरिषदेकडून प्राप्त करून घेणे, दरवर्षी परवानगी पुनर्जिवीत करणे इत्यादी जबाबदाऱ्या विकासकाच्या व संबधित बांधकामासाठी नियुक्त केलेल्या वास्तुविशारद यांच्या असतात, परवानगी घेतली असल्याने हे बांधकाम अनाधिकृत नाही, परवानगी घेतल्यानंतर एक वर्षात काम सुरू न केल्यास परवानगी रद्द होते मात्र काम सुरू असल्यास पुन्हा एक वर्षाने परवानगी घ्यावी असे नमूद नाही़ या प्रकरणात बांधकाम बेकायदेशीर आहे असा चुकीचा युक्तीवाद करून मुख्याधिकाऱ्यांना गोवण्यात आले आहे़ अटाकोरे यांच्या वरील कारवाई मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़
जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन दिले़ यावेळी मुख्याधिकारी धैर्यशील जाधव (शिर्डी), शाम गोसावी (कोपरगाव), डॉ़श्रीनिवास कुऱ्हे (संगमनेर), गणेश श्ािंदे (राहुरी), संतोष खांडेकर (श्रीरामपुर), विनोद जळक (देवळाली प्रवरा), जनार्दन पवार (प्रशिक्षणार्थी) आदींची उपस्थीती होती़
(वार्ताहर)

Web Title: Movement of the Chiefs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.