चुप्पी साधलेल्या बोठेने उघडले तोंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST2021-03-18T04:20:54+5:302021-03-18T04:20:54+5:30
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बोठे याला १३ मार्च रोजी पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली. ...

चुप्पी साधलेल्या बोठेने उघडले तोंड
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बोठे याला १३ मार्च रोजी पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली. त्याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. गेल्या चार दिवसांपासून तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक साैरभकुमार अग्रवाल हे बोठे याची कसून चौकशी करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही त्याची चौकशी केली. बोठे याने जरे यांची हत्या का व कशी केली. हीच महत्त्वपूर्ण बाब पोलिसांना समजून घ्यावयाची आहे. बोठे पोलिसांसमोर बोलू लागल्याने हत्याकांडाच्या तपासाला गती मिळाली आहे. दरम्यान बोठे याने चौकशीत काय सांगितले, हे तपासाचा भाग म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.
----------------------------
‘त्या’ आय फोनसाठी बोलविणार एक्सपर्ट
बाळ बोठे याचा आयफोन पोलिसांच्या ताब्यात आहे. या फोनचा बोठेकडूनही पासवर्ड मिळाला नाही. त्यामुळे हा फोन ओपन करण्यासाठी पोलीस आता एक्सपर्टची मदत घेणार आहेत. हा फोन उघडल्यानंतर त्यातून पोलिसांना महत्त्वपूर्ण पुरावे मिळण्याची शक्यता आहे.