मोटारसायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:41+5:302021-02-12T04:20:41+5:30
--------- मोटारसायकलच्या धडकेत जखमी अहमदनगर : मोटारसायकलच्या धडकेत वृद्ध जखमी झाला. याबाबत केशव लक्ष्मण गोरे (रा. रूईछत्तीशी, ता.नगर) यांनी ...

मोटारसायकलची चोरी
---------
मोटारसायकलच्या धडकेत जखमी
अहमदनगर : मोटारसायकलच्या धडकेत वृद्ध जखमी झाला. याबाबत केशव लक्ष्मण गोरे (रा. रूईछत्तीशी, ता.नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १० फेब्रुवारी रोजी फिर्यादी मोटारसायकलवर जात असताना मार्केट यार्डजवळ अचानक समोरून आलेल्या एमएच १६- बीआर ३७६६ वरील चालकाने धडक दिली. त्यात गोरे जखमी झाले.
--------------
वाहनाच्या धडकेत दोघे जखमी
अहमदनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जखमी झाले. नगर-जामखेड रोडवर निंबोडी शिवारात ७ फेब्रुवारी हा अपघात झाला. याबाबत आकाश संपत गायकवाड (वय २१, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गायकवाड व गणेश बापू धनवटे (रा. उक्कलगाव) हे ७ फेब्रुवारी रोजी आष्टीवरून दुचाकीने जामखेड रोडने नगरकडे येत होते. त्यावेळी निंबोडी शिवारात समोरून आलेल्या मोठ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात गायकवाड व धनवटे दोघे जखमी झाले.