स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जिल्हा संघटकपदी मोटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST2021-09-17T04:25:49+5:302021-09-17T04:25:49+5:30
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील रोहित मोटकर यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहमदनगर जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ...

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जिल्हा संघटकपदी मोटकर
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील रोहित मोटकर यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहमदनगर जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी नुकतेच मोटकर यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी मोटकर यांना स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले, मार्गदर्शक शिवशाहीर कल्याण काळे, निंबा मराठे, प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, कार्याध्यक्ष रावसाहेब कावरे, मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे, उपाध्यक्ष अर्जुन लिपणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा निमसे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, युवक जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे, संपर्क प्रमुख सतीश पवार, शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांनी शुभेच्छा दिल्या. यापुढे जिल्ह्याभरात मराठा तरुण जोडो अभियान मराठा महासंघाच्या माध्यमातून जोमाने राबवले जाईल. संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मोटकर यांनी सांगितले.
160921\img-20210914-wa0070.jpg
दहिगावने - रोहित मोटकर पासपोर्ट फोटो