मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:22+5:302021-03-15T04:19:22+5:30

संगमनेर : भारतीय शिक्षण पद्धतीत सहज शिक्षण पद्धतीचा समावेश करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. सहज शिक्षणाने खऱ्या अर्थाने विद्यार्थी ...

Mother tongue education gives students in-depth knowledge | मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळते

मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळते

संगमनेर : भारतीय शिक्षण पद्धतीत सहज शिक्षण पद्धतीचा समावेश करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. सहज शिक्षणाने खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळते, असे मत प्रा. डॉ. संदीप आरोटे यांनी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (दि. १३) प्राध्यापक चर्चा मंडळाच्या वतीने ‘बदलत्या शिक्षण प्रवाहात शिक्षकांची भूमिका’ या विषयावर प्रा. आरोटे बोलत होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना अध्यापन करताना मातृभाषेतून संकल्पना समजावून सांगणे गरजेचे आहे. शिक्षकांना स्वायत्ता दिल्यास अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावी होते, असेही आरोटे म्हणाले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, प्रा. प्रकाश गोडगे चर्चा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. मारुती कुसमुडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. कुसमुडे यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. गुंजाळ यांनी आभार मानले.

Web Title: Mother tongue education gives students in-depth knowledge