नेवासा ग्रामीण रुग्णालयासाठी मदर तेरेसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:21 IST2021-05-12T04:21:43+5:302021-05-12T04:21:43+5:30
सेवाभावी संस्थेकडून दीड लाखांचा निधी नेवासा : मदर तेरेसा सेवाभावी संस्थेकडून नेवासा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन लाइन उभारण्यासाठी दीड लाख ...

नेवासा ग्रामीण रुग्णालयासाठी मदर तेरेसा
सेवाभावी संस्थेकडून दीड लाखांचा निधी
नेवासा : मदर तेरेसा सेवाभावी संस्थेकडून नेवासा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन लाइन उभारण्यासाठी दीड लाख रुपयांचा धनादेश नाशिक धर्मप्रांताचे प्रमुख बिशप डॉ. लुड्स डॅनियल यांच्या हस्ते प्रांताधिकारी गणेश पवार, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहसीन बागवान यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात ५० बेडची सुविधा आहे. त्यामध्ये चाळीस ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रांताधिकारी गणेश पवार व तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहसीन बागवान यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनऐवजी ऑक्सिजन लाइन देण्याचा निर्णय झाला. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी बिशप लुड्स डॅनियल यांनी प्रार्थना केली.
नाशिक धर्म प्रांताचे प्रमुख बिशप डॉ. लुड्स डॅनियल यांनी हे रुग्णालय रुग्णांसाठी तीर्थक्षेत्रासमान ठरेल, येथे येणारा रुग्ण येथून बरा होऊन बाहेर पडेल, अशी आशा व्यक्त केली.
ऑक्सिजन लाईन सेवेसाठी धनादेश प्रदान करतेवेळी नेवासा प्रेस क्लबचे संपर्कप्रमुख सुधीर चव्हाण, ॲड. राजेंद्र पंडित, मार्कस बोर्डे, शिक्षक संघटनेचे नेते भास्कर नरसाळे उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोहसीन बागवान यांनी आभार मानले.