बिबट्याच्या तावडीतून आईनं केली मुलीचा सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:44 IST2019-01-03T16:42:53+5:302019-01-03T16:44:17+5:30

कोतूळ परिसरातील पिसेवाडी शिवारात तन्वी एकनाथ जाधव (वय- १२) सातवीत शिकणा-या विद्यार्थीनीवर बिबट्याने हल्ला केला.

Mother released the girl from the clutches of a leopard | बिबट्याच्या तावडीतून आईनं केली मुलीचा सुटका

बिबट्याच्या तावडीतून आईनं केली मुलीचा सुटका

कोतूळ : कोतूळ परिसरातील पिसेवाडी शिवारात तन्वी एकनाथ जाधव (वय- १२) सातवीत शिकणा-या विद्यार्थीनीवर बिबट्याने हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर मुलीने आरडाओरडा केल्याने आई व चुलतीनं बिबट्याच्या तावडीतून तन्वीला सोडविले.
पिसेवाडी शिवारात तन्वी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील शेतात ज्वारीच्या पिकावर बसलेली पाखरं हाकत होती. यावेळी बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. तन्वीने आरडाओरडा करताच घरातून आई व चुलती पळत आल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता त्या दोघींनी तन्वीला बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली. तन्वी जखमी झाल्याने तिला कोतूळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title: Mother released the girl from the clutches of a leopard