राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 08:27 IST2019-08-18T08:08:17+5:302019-08-18T08:27:41+5:30

राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधूताई बाळासाहेब विखे पाटील यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

Mother of Radhakrishna Vikhe Patil is passes away | राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक

राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक

ठळक मुद्देलोणी येथे अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: माजी केंद्रीय मंञी, पद्मभूषण(स्व.) बाळासाहेब विखे पत्नी तर मंत्री राधाकृष्ण विखे  विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधुताई विखे पाटील यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्या ८५वर्षाच्या होत्या.
आज प्रवरा ग्रामीण रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी १२वा. प्रवरानगर येथील पद्मश्री विखे कारखान्याच्या डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.
   त्यांच्या पश्चात जागतिक आरोग्य संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोकविखे, गृहनिर्माण मंञी राधाकृष्ण विखे आणि प्रवरा अभिमत विद्यापिठाचे प्र कुलगुरू डॉ.राजेंद्र विखे ही तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. खासदार डॉ.सुजय विखे यांच्या त्या आजी होत. तर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या सासू होत.

चार दशकाहून अधिक काळ जिल्ह्यावर राजकीय अधिराज्य गाजविणा-या पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या  राजकीय जडण घडणीत सिंधूताईचा  मोठा वाटा राहिला.

Web Title: Mother of Radhakrishna Vikhe Patil is passes away