टेम्पोच्या धडकेत माजी सैनिकासह आईचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:25+5:302021-07-27T04:22:25+5:30
पळवे : नगर-पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे सोमवारी (दि.२६) दुपारी तीनच्या सुमारास टेम्पोने पाठीमागून येऊन दुचाकीस उडविले. दुचाकीवरील माजी ...

टेम्पोच्या धडकेत माजी सैनिकासह आईचा मृत्यू
पळवे : नगर-पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे सोमवारी (दि.२६) दुपारी तीनच्या सुमारास टेम्पोने पाठीमागून येऊन दुचाकीस उडविले. दुचाकीवरील माजी सैनिकासह आईचा जागीच मृत्यू झाला.
माजी सैनिक बळवंत सुखदेव जवक (वय ४५), मातोश्री पारूबाई सुखदेव जवक (वय ६५), दोघे रा. रांजणगाव, ता. पारनेर अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
बळवंत जवक व पारूबाई जवक या एका दुचाकीहून नगर-पुणे रस्त्यावरून शिरूरकडून सुप्याच्या दिशेने येत होते. ते म्हसणे फाटा येथे आले असता पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने दुचाकीस धडक दिली. त्यात बळवंत जवक, पारूबाई जवक यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोही दुभाजक तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. त्यामुळे बराच वेळ वाहतूक बंद होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन गोकावे पथकासह पोहोचले. त्यांनी तेथील तरुणांच्या सहाय्याने टेम्पो बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.