मोबाईलवर बोेलण्याच्या कारणावरून आईचाच मुलावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:37 IST2019-07-16T18:35:26+5:302019-07-16T18:37:16+5:30
फोनवर कीती बोलतेस असे विचारल्याचा राग आल्याने मध्यरात्री भर झोपेत असताना आईने मुलाचे तोंड दाबून चाकूने वार केल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली

मोबाईलवर बोेलण्याच्या कारणावरून आईचाच मुलावर चाकूहल्ला
नेवासा : फोनवर कीती बोलतेस असे विचारल्याचा राग आल्याने मध्यरात्री भर झोपेत असताना आईने मुलाचे तोंड दाबून चाकूने वार केल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गिडेगाव येथे मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला असून जखमी झालेल्या विशाल दीपक साळुंखे (वय-१८) गंभीर जखमी झाला आहे.
विशाल साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची आई शोभा दीपक साळुंखे हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.
सोमवार (दि.१५) रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी शोभा ही फोनवर बोलत होती. त्यावेळी विशालने तिला हटकले. ‘किती वेळ फोनवर बोलतेस,’ असे विचारले. तेव्हा आई शोभा हिने ‘मी कीतीपण वेळ बोलेल. तुला काय करायचे, असे रागाने म्हणाली. त्यानंतर विशाल जेवण करून बाहेर अंगणात झोपलेला असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे कोणी तरी तोंड दाबले. त्याला जाग आली तेव्हा आईनेच त्याचे तोंड दाबलेले कळाले. त्याला काही कळायच्या आत आईने हातातील चाकूने कानाखाली व तोंडावर वार करत होती. विशाल ने हाताने चाकू धरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातावर वार केला. तुझ्यात किती बळ आहे ते पाहतेच, असे म्हणत आईचा मुलावर हल्ला सुरुच होता. विशालने कशी तरी सुटका करून घेतली. त्यानंतर गळनींब येथील आत्या संगिता दिगबंर शेळके यांना फोन करून बोलावून घेतल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलवरील बोलण्याच्या किरकोळ कारणावरून आईनेच मुलावर थेट चाकू हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे