मोरनाथ महाराज यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:39+5:302021-06-02T04:17:39+5:30
मोरनाथ महाराज यांनी ब्रह्मचारी व्रत घेतले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी मौन व्रत धारण केले होते. मोरनाथ महाराज यांचे ...

मोरनाथ महाराज यांचे निधन
मोरनाथ महाराज यांनी ब्रह्मचारी व्रत घेतले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी मौन व्रत धारण केले होते. मोरनाथ महाराज यांचे खरे नाव जालिंदर महादू गवळी होय. तरुण वयापर्यंत ते सामान्य जीवन जगत होते. ऐन तारुण्यात त्यांचा उत्तर भारतीय साधूंशी संपर्क झाला. त्या साधूंच्या सहवासात त्यांनी वैराग्याचा मार्ग स्वीकारला. गावात आई, वडील, भाऊ व बहिणी असताना, त्यांनी मंदिरात राहणे पसंत केले. ते गावात दीक्षा गोळा करून आपली उपजीविका करत होते. मोरनाथ महाराज उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. तालुका व जिल्हा पातळीवर क्रिकेटच्या स्पर्धात ते विसापूर क्रिकेट संघाकडून सहभागी होत असत. मोरनाथ महाराज यांनी सहा गावरान गायींचे संगोपन केले होते. महाराजांच्या निधनानंतर त्या गायी पोरक्या झाल्या आहेत.
010621\img-20210601-wa0084.jpg
मोरनाथ महाराज