स्वतःची आंतरिक प्रेरणा अधिक महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:10+5:302021-08-12T04:25:10+5:30
कोपरगाव : विद्यार्थ्यांनी पदवीसाठी किंवा केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा म्हणून विषय न निवडता, आपली आवड व गती ...

स्वतःची आंतरिक प्रेरणा अधिक महत्त्वाची
कोपरगाव : विद्यार्थ्यांनी पदवीसाठी किंवा केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा म्हणून विषय न निवडता, आपली आवड व गती बघून बघून विषय निवडावा. स्पर्धा परीक्षेसाठी पदवी स्तरावरील गुणवत्तेबरोबरच स्वतःची आंतरिक प्रेरणा अधिक महत्त्वाची असते, केवळ कुणीतरी सांगितले म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करू नये, तसेच कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांतील विद्यार्थ्यांनी अगदी बारावीपासून यूपीएससीची तयारी करावी, असे आवाहन अहमदनगरचे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले.
कोपरगाव शहरातील के. जे. सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी यूपीएससी मार्गदर्शनपर ऑनलाइन व्याख्यान सत्राचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकचे संचालक डॉ. मालोजीराव भोसले यांची विशेष उपस्थिती होती.
भंडारे म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये स्मार्टफोन हा अत्यंत वेगाने मागे खेचणारा मोठा सायलेंट किलर आहे. त्याचबरोबर मित्रपरिवार कुटुंब व आई-वडील यांची सकारात्मक भूमिका विद्यार्थ्यांना लवकर यशोशिखरावर नेते. यावेळी सांगली येथील जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, डॉ. मालोजीराव भोसले यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानात संपूर्ण महाराष्ट्रातून ३०० पेक्षा अधिक उमेदवार उपस्थित होते. प्रामुख्याने यात कोपरगाव व राहाता तालुक्यातील एकूण अकरा महाविद्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली होती. व्याख्यानाचे प्रास्ताविक प्रा. विजय ठाणगे यांनी केले. डॉ. वसुदेव साळुंके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे, प्रा. रवींद्र जाधव सहकारी लाभले.