दुचाकीच्या धडकेत वानराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:27+5:302021-07-02T04:15:27+5:30
याबाबत वृत्त असे की, गुरुवारी सकाळी नऊ वाजलेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात काही वानरे रस्ता ओलांडत असताना त्याच ...

दुचाकीच्या धडकेत वानराचा मृत्यू
याबाबत वृत्त असे की, गुरुवारी सकाळी नऊ वाजलेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात काही वानरे रस्ता ओलांडत असताना त्याच दरम्यान पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीने (क्र. एम. एच. १२ ए. एस. ९९७८) वानरांना धडक दिली. यात एक वानर जागीच ठार झाले. तर दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. या दाम्पत्याचे नाव मात्र समजू शकले नाही मात्र, त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. वानराचा मृत्यू झाल्याची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले व महामार्ग पोलिसांनी वनविभागाला दिली.
दरम्यान , वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळे बाळेश्वरचे वनपाल आर.बी. माने ,वनरक्षक डी. आर. कडनर ,वन कर्मचारी दत्तात्रय थिटमे,एकनाथ घुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत वानराला ताब्यात घेत पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून शवविच्छेदन करण्यात आले. पुढे चंदनापुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात वानरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.