शेवगावमधून मोनिका राजळे यांनीही शक्तीप्रदर्शन करीत केला अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 13:49 IST2019-10-03T13:48:42+5:302019-10-03T13:49:03+5:30
शेवगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज शेवगाव येथील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे दाखल केला.

शेवगावमधून मोनिका राजळे यांनीही शक्तीप्रदर्शन करीत केला अर्ज दाखल
विखे, शिंदे, गांधी यांची उपस्थिती : दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांची हजेरी
शेवगाव/पाथर्डी : शेवगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज शेवगाव येथील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे दाखल केला.
आमदार राजळे यांनी शेवगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ््यालाही आमदार राजळे यांनी अभिवादन केले. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील भाजपचे असंख्य कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. भगव्या पताका, भगवे पंचा घळ््यात घालून कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. राजळे यांनी जनतेलाही हात उंचावून अभिवादन केले.
राजळे यांनी आधी ११.१० वाजता मुहुर्तावरचा अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी मिरवणुकीने शेवगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी खासदास दिलीप गांधी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजळे यांच्या मिरवणुकीला शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.