शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

Dhule Municipal Election 2018 : पैशांचा खेळ, आरोपांच्या फैरी; नगर, धुळ्यात आज मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 12:32 IST

महापालिका निवडणुकीसाठी रविवारी धुळे व अहमदनगरमध्ये मतदान होत असून, धुळ्यात पैशांचा खेळ सुरू आहे. पैसेवाटप करीत असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे दोन जणांवर चाकूहल्ला झाला.

धुळे/अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी रविवारी धुळेअहमदनगरमध्ये मतदान होत असून, धुळ्यात पैशांचा खेळ सुरू आहे. पैसेवाटप करीत असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे दोन जणांवर चाकूहल्ला झाला. हल्ल्याप्रकरणी लोकसंग्रामच्या चार जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला. याशिवाय अन्य घटनेत एकास ४९ हजार रुपयांसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मतदारयादी सापडली. अहमदनगरमध्ये शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीत चुरस आहे.धुळ्यात ७४ जागांसाठी ३५५ तर नगरला ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही ठिकाणी सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. धुळ्यात आमदार अनिल गोटेंच्या (लोकसंग्राम पक्ष) रूपाने भाजपा विरोधात भाजपा अशी लढत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी असून, शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. भाजपाविरोधात सर्वच पक्ष एकवटले आहेत. काही प्रभागात या पक्षांनी एकमेकांना पडद्यामागून पाठिंबा दिला आहे. भाजपा महिला उमेदवाराच्या विनयभंगाचीही तक्रार दाखल झाली आहे. लोकसंग्रामच्या गुंडांनी धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली़ त्यामुळे गुंड कोण, हे धुळेकरांनीच ठरवावे़ आमदार उगाच आदळआपट करीत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी केली.अनिल गोटे यांचा आरोपभाजपाला सत्तेचा माज व पैशांची मस्ती चढली आहे़. चार खासदार, २२ आमदार आणि पाच जिल्ह्यांतील भाजपाचे मंत्री धुळ्यात आले आहेत. पोलिसांसह यंत्रणा दडपणाखाली आहे, असा आरोप अनिल गोटे यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूक