मोहटादेवीस दीड कोटींचे दान

By Admin | Updated: October 24, 2016 18:23 IST2016-10-24T18:23:31+5:302016-10-24T18:23:31+5:30

नवरात्रोत्सवात मोहटागड (ता. पाथर्डी) येथील जगदंबा देवी मोहटा देवस्थानच्या दानपेटीत रोख व इतर वस्तूंच्या स्वरूपात एक कोटी चौसष्ठ हजार पंच्याहत्तर रुपये देणगी

Mohta Devis donation of one and a half million | मोहटादेवीस दीड कोटींचे दान

मोहटादेवीस दीड कोटींचे दान

ऑनलाइन लोकमत
पाथर्डी, दि. 24 -  नवरात्रोत्सवात मोहटागड (ता. पाथर्डी) येथील जगदंबा देवी मोहटा देवस्थानच्या दानपेटीत रोख व इतर वस्तूंच्या स्वरूपात एक कोटी चौसष्ठ हजार पंच्याहत्तर रुपये देणगी स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपात २८० ग्रॅम सोने व दहा किलो चांदी अर्पण करण्यात आली.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या १ ते १५ आॅक्टोबरच्या कालावधीत मोहटागडावर राज्यभरातून तसेच परराज्यातील भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी आले होते. भाविकांनी रोख स्वरूपात दानपेटीत ७२ लाख ४५ हजार ७६० रुपये तर इतर देणगी स्वरुपात २८ लाख १८ हजार ३१५ असे मिळून एक कोटी चौसष्ट हजार पंच्याहत्तर रुपये दानपेटीत टाकले. याशिवाय वस्तू स्वरूपात २८० ग्रॅम सोने व दहा किलो सहाशे ग्रॅम चांदी भाविकांनी अर्पण केली. दिवसेंदिवस मोहटादेवी गडावर भाविकांची संख्या वाढत आहे. नवरात्रोत्सवात तालुक्यातील परंतु बाहेरगावी स्थायिक झालेला प्रत्येक जण हमखास देवी दर्शनासाठी पाथर्डीला येतो व मोहटादेवीचे दर्शन घेऊन जातो. मंगळवार ,शुक्रवार व पौर्णिमेच्या दिवशी गडावर मोठया प्रमाणात गर्दी असते. अलीकडील काळात मोहटादेवीच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. काही काम अजून बाकी आहे. मोहटादेवीगडावर जिर्णोद्धाराचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे भाविकांना नवरात्रोत्सवात सुलभपणे दर्शन घेता आले. देवस्थानसमितीने नवरात्रोत्सवात भाविकांसाठी चांगल्या प्रकारे व्यवस्था केल्याने समाधान व्यक्त होत होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mohta Devis donation of one and a half million