रांगोळी स्पर्धेत मोहिनी राजगुरू प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:15+5:302021-03-15T04:19:15+5:30
जामखेड : महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत मोहिनी राजगुरू यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे ...

रांगोळी स्पर्धेत मोहिनी राजगुरू प्रथम
जामखेड : महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत मोहिनी राजगुरू यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे यांनी महिला व युवतींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथम क्रमांकाचे ५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस मोहिनी राजगुरू, द्वितीय अंजली तुपेरे ३ हजार ३३३, तृतीय शिवानी आरेकर २ हजार २२२ तर चतुर्थ १ हजार १११ रुपयांचे नेहा जसाभाटी हिने पटकाविले. नुकतेच बक्षीस वितरण पार पडले.
अध्यक्षस्थानी प्रजापती ब्रह्मकुमारी मठाच्या शोभा दीदी या होत्या. माजी नगराध्यक्ष अर्चना सोमनाथ राळेभात, सारोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू अजय काशीद, प्रांजल अमित चिंतामणी प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका पुष्पा बेलेकर, सुनीता केवडे, संगीता बोराटे, शारदा बेलेकर, उषा राळेभात, सुमन जगदाळे, बुधवंत, उदावंत उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आरती चेतन राळेभात यांनी केले.
---
१४ जामखेड महिला