मोहटा देवस्थानच्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:35 IST2017-09-11T22:35:01+5:302017-09-11T22:35:01+5:30

पाथर्डी : मोहटा देवस्थानने वनविभागाकडे तक्रारी करून पूजा साहित्य विक्री करणाºया ग्रामस्थांचे अतिक्रमण हटविले. मात्र, देवस्थानने स्वत:च अतिक्रमण केले असताना ते हटविले जात नाही, असा आरोप करत मोहटा ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. याप्रश्नी १५ सप्टेंबरला बैठक बोलविण्याचे आश्वासन तहसीलदार व वनविभागाने दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

mohata,devsthan,trust,ilegeal,construction, | मोहटा देवस्थानच्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांचे उपोषण

मोहटा देवस्थानच्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांचे उपोषण

कमत न्यूज नेटवर्कपाथर्डी : मोहटा देवस्थानने वनविभागाकडे तक्रारी करून पूजा साहित्य विक्री करणाºया ग्रामस्थांचे अतिक्रमण हटविले. मात्र, देवस्थानने स्वत:च अतिक्रमण केले असताना ते हटविले जात नाही, असा आरोप करत मोहटा ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. याप्रश्नी १५ सप्टेंबरला बैठक बोलविण्याचे आश्वासन तहसीलदार व वनविभागाने दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी ३० आॅगस्टला तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्यात म्हटले आहे, आम्ही सर्व छोटे व्यावसायिक गत ५० वर्षांपासून मोहटा गडावर पूजासाहित्य, स्टेशनरी विक्री करून उदरनिर्वाह चालवत होतो. परंतु देवस्थानचे विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वन विभागाकडे तक्रारी करुन आमची अतिक्रमणे हटविण्यास भाग पाडले. मात्र याच विश्वस्त मंडळाने बेकायदेशीर उत्खनन करून झाडे तोडून वन विभागाच्या क्षेत्रावर अतिक्रमण केलेले असताना प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही. याप्रकरणात देवस्थानने न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान केलेला आहे. आमची वाहने वनजमिनीत आढळली की कारवाई होते, मात्र देवस्थानला येणाºया शेकडो वाहनांची पार्किंग वनविभागाच्या जागेत असताना हा विभाग काहीच कारवाई करत नाही. आम्ही संघटनेच्या वतीने २०१२-१३ मध्ये वनजमीन मागणीसाठी आंदोलने केली होती. त्यावेळेस केंद्र शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय वनजमीन देता येत नाही, असे वनविभागाने कळविले होते. त्यानुसार राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याची शिफारस केली होती. तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी अतिक्रमणे न काढता प्रस्ताव दाखल करा, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, वनविभागाने देवस्थानचे विश्वस्त व कार्यकारी अधिकाºयांच्या दबावापोटी आमची अतिक्रमणे हटवली. सरपंच हर्षवर्धन पालवे हेही ग्रामपंचायतची दिशाभूल करत आहेत. आम्ही मंदिर पाडायला निघालो आहोत, अशा अफवा पसरवून देवस्थानच्या अतिक्रमणाला अभय दिले जात आहे. गुंडांकरवी आम्हाला धमक्याही दिल्या जात आहेत.निवेदनावर सुनील जाधव, सोपान भिंगारे, अशोक कुºहाडे, अंबादास डोंगरे, आजिनाथ दहिफळे, आसाराम दहिफळे, बंडू बन, नवनाथ चिंतामणी, विजय डोंगरे, गणेश घुले, देविदास लोखंडे, सचिन आव्हाड, रावसाहेब पालवे, रमेश डोंगरे यांच्या स्वाक्षºया आहेत. निवेदनावर काहीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी सोमवारी भर पावसात उपोषण केले. त्यांना प्रा. किसन चव्हाण यांनीही पाठिंबा दिला. सायंकाळी उपोषणकर्ते ग्रामस्थ, तहसीलदार नामदेव पाटील तसेच वनपरिक्षेत्रपाल शिरीष निर्भवणे यांच्यात चर्चा झाली. येत्या पंधरा तारखेला ४ वाजता याबाबत मार्ग काढण्यासाठी तहसीलदारांच्या दालनात विश्वस्त- मुख्याधिकाºयांची बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. तहसीलदार पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना यास दुजोरा दिला.

Web Title: mohata,devsthan,trust,ilegeal,construction,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.