मोदी सरकारने बहुमताचा गैरवापर केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:55+5:302021-02-06T04:37:55+5:30
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, जिल्हा संघटक डॉ. महेश क्षीरसागर, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, अरुण पाटील, ...

मोदी सरकारने बहुमताचा गैरवापर केला
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, जिल्हा संघटक डॉ. महेश क्षीरसागर, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, अरुण पाटील, अशोक थोरे, लखन भगत , निखिल पवार, यासीन सय्यद, रामा अग्रवाल, मदनलाल बत्रा, सुभाष जंगले, सागर हरके, रमेश घुले, किशोर फाजगे आदी यावेळी उपस्थित होते. तहसीलदार प्रशांत पाटील यांना आंदोलकांनी निवेदन दिले.
केंद्र सरकारला जनतेने दोन वेळेस पूर्ण बहुमत दिले. मात्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पडलेले असताना पेट्रोल व डिझेलमध्ये दरवाढ केली. त्यामुळे सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे अनेक तरुणांनी रोजगार गमावले. आता अनेकांचे व्यवसाय मोडकळीस आले आहेत. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. त्यात इंधन दरवाढीने प्रचंड हाल होत आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.
इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मशागतीच्या खर्चात वाढ झाली असून त्यात त्यांच्या मालाला भाव नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीत सरकारने खंजीर खुपसला आहे, असा आरोप करण्यात आला. यावेळी नीलेश पाटणी, किशोर नाईक,कैलास पुजारी, कैलास भणगे, शुभम ताके, शुभम आढाव, सतु महाराज गौड, प्रदीप वाघ, सुधा तावडे उपस्थित होते.
--------
फोटो ओळी : शिवसेना
शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
------