तरुणीचा विनयभंग; दोघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:35 IST2020-02-28T12:35:31+5:302020-02-28T12:35:39+5:30
शेतात बसलेल्या एका १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील तामसवाडी येथे सोमवारी (२४ फेब्रुवारी) घडली. याप्रकरणी दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीचा विनयभंग; दोघांविरुध्द गुन्हा
शेवगाव : शेतात बसलेल्या एका १९ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील तामसवाडी येथे सोमवारी (२४ फेब्रुवारी) घडली. याप्रकरणी दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी, तामसवाडी परिसरात दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी सदर तरुणी शेतात एका आंब्यात झाडाखाली बसली होती. यावेळी तेथे दिलीप भास्कर जगताप, गणेश महादेव पातकळ आले. त्यांनी माझा विनयभंग केला, अशी तक्रार सदर तरुणीने शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या फिर्यादीवरुन पोलिसांनी दिलीप जगताप, गणेश जगताप या दोघांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली आहे.