कुख्यात पठारे बंधूसह सहा जणांविरोधात मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:38+5:302021-07-11T04:16:38+5:30
विजय राजू पठारे (४०) अजय राजू पठारे (२५), बंडू ऊर्फ सूरज साहेबराव साठे (२२), अनिकेत विजू कुचेकर (२२), प्रशांत ...

कुख्यात पठारे बंधूसह सहा जणांविरोधात मोक्का
विजय राजू पठारे (४०) अजय राजू पठारे (२५), बंडू ऊर्फ सूरज साहेबराव साठे (२२), अनिकेत विजू कुचेकर (२२), प्रशांत ऊर्फ मयूर राजू चावरे (२४) व अक्षय गोविंद शिरसाठ (२३ सर्व रा. अहमदनगर) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या टोळीविरोधात नगर शहरात विविध ठिकाणी दरोडा टाकणे, जबरी चोरी, घातक शस्त्रांचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी, अनधिकृतपणे घरात प्रवेश, सरकारी कामात अडथळा, गैरकायद्याची मंडळी जमविणे, विनयभंग, दुखापत, हद्दपार आदेशाचा भंग, आर्म ॲक्ट, आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरोधात मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. शनिवारी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने आरेापींविरोधात कारवाई केली.
......................
संघटित गुन्हेगारांना वचक
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार घेतल्यापासून संघटित गुन्हे करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत पाच कुख्यात टोळ्यांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून, टू-प्लस योजनेंतर्गत ३ हजार गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. यामुळे संघटित गुन्हे करणाऱ्यांमध्ये वचक निर्माण झाला आहे.