मनसेच्या ‘त्या’ नेत्याने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:41 IST2020-07-11T12:40:35+5:302020-07-11T12:41:27+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी शनिवारी ( ११ जुलै) समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची भेट घेतली. पानसे हे महाराजांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी आले होते.

मनसेच्या ‘त्या’ नेत्याने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट..
संगमनेर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी शनिवारी ( ११ जुलै) समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची भेट घेतली. पानसे हे महाराजांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी आले होते.
इंदोरीकर महराजांच्या भेटीनंतर पत्रकारांनी बोलताना पानसे म्हणाले, एखाद्या छोट्या चुकीची दिलगिरी महाराजांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे चांगले कार्य घडत आहे. त्यांनी स्वत:ची शाळा काढली आहे. त्यांचे हे मोठे कार्य आपण विसरणार आहोत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत झोळेकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सचिव डॉ. संजय नवथर, सरचिटणीस तुषार बोंबले आदी यावेळी उपस्थित होते.