दूध दरवाढ आंदोलनात मनसेची उडी; शेवगावात गरिबांना वाटले मोफत दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 13:06 IST2020-07-24T13:06:06+5:302020-07-24T13:06:47+5:30
दूध उत्पादक शेतकरी, दूध व्यावसायिकांना लिटर मागे १० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (२४ जुलै) गोरगरीब जनतेला मोफत दूध वाटप करीत अनोखे आंदोलन करण्यात आले.

दूध दरवाढ आंदोलनात मनसेची उडी; शेवगावात गरिबांना वाटले मोफत दूध
शेवगाव : दूध उत्पादक शेतकरी, दूध व्यावसायिकांना लिटर मागे १० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (२४ जुलै) गोरगरीब जनतेला मोफत दूध वाटप करीत अनोखे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात दूध रस्त्यावर फेकून,ओतून देऊन दुधाची नासाडी करण्यापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेवगाव शहरातील डोबांरीवस्ती येथील ३० ते ४० कुटूंबाना दूधाचे वाटप करत प्रतिकात्मक आंदोलन केले.
यावेळी देवा हुशार,मंगेश लोंढे,नवनाथ डाके, बाळा वाघ, रवींद्र भोकरे, विठ्ठल दुधाळ, सुनील काथवटे, अमोल पालवे, ज्ञानेश्वर कुसळकर, संदीप देशमुख, सुरेश सूर्यवंशी, सतीश गुणवंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.