पुणतांबा येथील पत्रकारांचा मनसेकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST2021-02-08T04:18:32+5:302021-02-08T04:18:32+5:30

यावेळी ग्रामीण बातमीदारांना तारेवरची कसरत करीत बातमी करावी लागते. समाजातील वाईट प्रवृत्तींना सर्वसामान्यांसमोर मांडताना वेळप्रसंगी राजकीय, सामाजिक, सरकारी ...

MNS honors journalists from Puntamba | पुणतांबा येथील पत्रकारांचा मनसेकडून सन्मान

पुणतांबा येथील पत्रकारांचा मनसेकडून सन्मान

यावेळी ग्रामीण बातमीदारांना तारेवरची कसरत करीत बातमी करावी लागते. समाजातील वाईट प्रवृत्तींना सर्वसामान्यांसमोर मांडताना वेळप्रसंगी राजकीय, सामाजिक, सरकारी अधिकाऱ्यांच्या रोषालासुद्धा बळी पडावे लागत असूनही बातमीदार आपली जबाबदारी पार पाडत असतात. हे करीत असताना फक्त बातमीदार हीच भूमिका निभावणाऱ्या या पत्रकारांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा अल्पसा प्रयत्न असल्याचे मत रहाता तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणतांबा शहर अध्यक्ष संदीप लाळे, संजय सोनवणे, अक्षय सोमवंशी, गौरव वहाडने, विशाल ढोले, वैभव बोडखे, आदित्य घोडेराव, वाल्मिक घोडेकर, कमलेश महाकाळे, विलास जाधव, संदीप शेलकर, मनोजकुमार गुजराथी, किरण नाईक, श्रीरंग गोर्हे, अजय जोशी, चंद्रभान जोर्वे उपस्थित होते. संदीप लाळे यांनी प्रास्तविक केले, तर अक्षय सोमवंशी यांनी आभार मानले.

Web Title: MNS honors journalists from Puntamba