आमदारांनी पाच वर्षे वाया घालविली-प्रताप ढाकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:35 IST2019-10-18T12:34:34+5:302019-10-18T12:35:43+5:30
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला पाटपाण्याची सोय करण्यासाठी आमदारकी पणाला लावू. शेतीला शाश्वत पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय शेतक-यांची भरभराट होणार नाही. मागील पाच वर्षे आमदारांनी वाया घालविली. फक्त भावनिक मुद्यावर जनतेला भुलविले, असा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांनी केला.

आमदारांनी पाच वर्षे वाया घालविली-प्रताप ढाकणे
शेवगाव : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला पाटपाण्याची सोय करण्यासाठी आमदारकी पणाला लावू. शेतीला शाश्वत पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय शेतक-यांची भरभराट होणार नाही. मागील पाच वर्षे आमदारांनी वाया घालविली. फक्त भावनिक मुद्यावर जनतेला भुलविले, असा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांनी केला.
शेवगाव तालुक्यातील सुळेपिंपळगाव, चेडेचांदगाव, अधोडी, शिंगोरी, राणेगाव, लखमापुरी, खामपिंप्री, पिंगेवाडी या गावांमध्ये ढाकणे यांनी प्रचार फेरी काढून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ढाकणे म्हणाले, बोधेगाव व परिसराला शेतीसाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे. जायकवाडी धरणातून पाट अथवा चारीद्वारे पाणी मिळूही शकते. आमदारांना पाच वर्षाच्या काळात या प्रश्नाला न्याय देण्यासाठी वेळ होता. परंतु त्यांनी काहीही केले नाही. उलट शेवगाव व पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी देण्याची मागणी करणाºयांची त्यांच्याकडून चेष्टा करण्यात आली. पाण्यासारख्या प्रश्नात लोकप्रतिनिधी जनतेची चेष्टा करणार असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ढाकणे म्हणाले, त्यांना अपघाताने आमदारकी मिळाली. पाच वर्षाच्या काळात त्यांनी केवळ भावनिकतेचे राजकारण केले. ज्या पक्षाने त्यांना संधी दिली. त्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग त्यांनी केले. ज्या मुंडे साहेबांचे ते नाव घेतात, त्यांच्यासाठी व भाजपसाठी त्यांचे योगदान काय हे राजळेंनी सांगावे, असा प्रश्न त्यांनी केला.