आमदार रोहीत पवारांनी नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांना दिला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:20 IST2020-10-15T14:20:02+5:302020-10-15T14:20:52+5:30

जामखेड - जामखेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांच्या निवडीनंतर सत्कार सोहळा कार्यक्रम उरकताच आ. रोहीत पवार यांनी त्यांना सभापती पदाच्या खुर्चीवर बसवून प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार दिला.

MLA Rohit Pawar handed over the charge to newly elected Speaker Rajshri More | आमदार रोहीत पवारांनी नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांना दिला पदभार

आमदार रोहीत पवारांनी नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांना दिला पदभार

जामखेड - जामखेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांच्या निवडीनंतर सत्कार सोहळा कार्यक्रम उरकताच आ. रोहीत पवार यांनी त्यांना सभापती पदाच्या खुर्चीवर बसवून प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार दिला.

      पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे यांची निवड होताच आ. रोहीत पवार हे पंचायत समितीच्या सभागृहात आले यावेळी त्यांनी सभापती मोरे यांचा सत्कार केला यावेळी आ. रोहीत पवार म्हणाले सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल ही मनोमन खात्री होती त्यामुळे तातडीने येथे आलो आहे. 

वर्षभराच्या कालावधीत नगरपरिषद पाठोपाठ पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. सभापती पदाच्या खुर्चीवर राष्ट्रवादीचा उमेदवार सर्वांच्या सहकार्यामुळे बसला आहे. 

      राजश्री ताई सभापती होतात त्यांनी तालुक्यातील महिलांचे प्रश्न, रस्ते व पाणी याबाबत विषय घेतले यापुढील काळात सर्व कामे मार्गी लावली जातील असा विश्वास सभापतींच्या वतीने व्यक्त केला यावेळी कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत मोरे, नगरसेवक पवनराजे राळेभात, डिगांबर चव्हाण, महेश निमोणकर, मोहन पवार, माजी सभापती सुभाष आव्हाड, बापूराव शिंदे, महेश यादव, काकासाहेब कोल्हे, युवक कॉग्रेसचे जिल्हा समन्वयक राहूल उगले, गणेश वारे, अमोल गिरमे, डॉ. चंद्रकांत मोरे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

( फोटो - आ. रोहीत पवार यांनी नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांना सभापती पदाचा पदभार दिला.) 

Web Title: MLA Rohit Pawar handed over the charge to newly elected Speaker Rajshri More