अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर आमदार मोनिका राजळे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 15:22 IST2021-02-08T15:19:43+5:302021-02-08T15:22:27+5:30
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर आमदार मोनिका राजळे बिनविरोध
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार राजळे यांनी विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
सातवड येथील सेवा सोसायटीच्या संचालक मथुराबाई संभाजी वाघ यांनीही अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सोमवारी (दि.८) मथुराबाई वाघ यांनी अर्ज मागे घेतल्याने आमदार राजळे यांची बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. वाघ या विखे गटाच्या समर्थक आहेत.