श्रीरामपुरातून हरवलेला मुलगा सापडला तामिळनाडूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:08+5:302021-08-15T04:23:08+5:30
हरेगाव येथून ३० जानेवारी २०२० रोजी अनिकेत अशोक खर्चन (वय १२) हा बेेपत्ता झाला होता. याबाबत अनिकेतच्या आईने श्रीरामपूर ...

श्रीरामपुरातून हरवलेला मुलगा सापडला तामिळनाडूत
हरेगाव येथून ३० जानेवारी २०२० रोजी अनिकेत अशोक खर्चन (वय १२) हा बेेपत्ता झाला होता. याबाबत अनिकेतच्या आईने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुलास पळून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांना या मुलाचा शोध न लागल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे २६ जुलै २०२१ रोजी वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याचा कक्षातील हेड कॉन्स्टेबल एस. बी. कांबळे यांनी तपास केला. निरीक्षक मसूद खान यांच्या सूचनेप्रमाणे कांबळे यांनी अनिकेत खर्चन याच्याबाबत महाराष्ट्रासह देशभरातील बालसुधारगृहे, सामाजिक संस्था, बाल कल्याण समिती यांना माहिती पाठविली होती. अखेर अनिकेत हा वेल्लपुरम बाल कल्याण समितीला आढळून आला. त्यानंतर अनिकेत यास नगर येथे पाठविले. कांबळे यांच्या पथकाने या मुलास नगरच्या बाल कल्याण समितीकडून ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी श्रीरामपूर पोलिसांकडे वर्ग केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.