कोपरगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 18:46 IST2019-10-04T18:46:01+5:302019-10-04T18:46:28+5:30
कोपरगाव शहरातील एका उपनगरात सहा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घराच्या पाठीमागे अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि़२) घडली़ याप्रकरणी गुरुवारी (दि़३) रात्री उशीरा कोपरगाव पोलीस ठाण्यात निहाल अजीज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे़

कोपरगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कोपरगाव : शहरातील एका उपनगरात सहा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घराच्या पाठीमागे अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि़२) घडली़ याप्रकरणी गुरुवारी (दि़३) रात्री उशीरा कोपरगाव पोलीस ठाण्यात निहाल अजीज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे़
पीडित मुलगी मैत्रिणीसोबत घराच्या पाठीमागे एका गाडीत खेळत होती़ त्यावेळी शेजारी राहणा-याने अत्याचार केला. गुरुवारी पीडित मुलीच्या गुप्तांगात वेदना होऊ लागल्या. यावेळी तिच्या घरच्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुरुवार (दि.३) रोजी रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निहाल अजीज शेख यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून आरोपीला शुक्रवार ( दि.४) न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे करीत आहेत. या घटनेने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.