कृषी राज्यमंत्र्यांमुळे कुकडीच्या कालव्यावर बसविले गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST2021-02-08T04:18:43+5:302021-02-08T04:18:43+5:30
कर्जत : कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यामुळे कुकडीच्या मुख्य कालव्यावर गेट बसविण्यात आले. त्यामुळे कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव व ...

कृषी राज्यमंत्र्यांमुळे कुकडीच्या कालव्यावर बसविले गेट
कर्जत : कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यामुळे कुकडीच्या मुख्य कालव्यावर गेट बसविण्यात आले. त्यामुळे कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव व खातगाव या दोन गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबद्दल कर्जत तालुका प्रहार संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
आंबिजळगाव व खातगाव या दोन्ही गावांना कानवळा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा फायदा होतो. आंबिजळगावजवळून कुकडीचा मुख्य कालवा गेला आहे. परंतु, आळसुंदे येथून उगम पावत असलेल्या कानवळा नदीवर कुकडीचे पाणी सोडण्यासाठी गेट बसवावे, अशी आंबिजळगाव व खातगाव येथील शेतकऱ्यांची मागणी होती. हा प्रश्न प्रहार संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा विमल बिभीषण अनारसे, प्रहारचे कर्जत तालुकाध्यक्ष सुदाम निकत, सागर निकत यांनी कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मांडला. या प्रश्नात मंत्री बच्चू कडू यांनी लक्ष घालून मंजुरी मिळवून दिली. तीन लाख रुपये खर्च करून हे गेट कुकडी विभागाने एक वर्षापूर्वी बसविले. या गेटमधून कुकडीचे पाणी सुटले. ते जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात मोठ्या प्रमाणावर साठले. यामुळे या भागातील पाण्याची पातळी वाढली म्हणून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.
गुरुवारी मंत्री बच्चू कडू हे आंबिजळगाव येथे आले होते. यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सुदाम निकत, सागर निकत, किशोर निकत, डॉ. राजेंद्र निकत आदी उपस्थित होते.
(फोटो ०७ बच्चू कडू)
आंबिजळगाव येथे मंत्री बच्चू कडू यांचे प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.