ऊर्जामंत्र्यांनी दिला ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना धीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST2021-02-08T04:18:49+5:302021-02-08T04:18:49+5:30
‘महावितरण’च्या तेलिखुंट कार्यालयात कर्मचारी प्रकाश शेळके, बापूसाहेब बडेकर आणि सहाय्यक अभियंता राजेंद्र पालवे यांना निखिल धंगेकर या आरोपीने शुक्रवारी ...

ऊर्जामंत्र्यांनी दिला ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना धीर
‘महावितरण’च्या तेलिखुंट कार्यालयात कर्मचारी प्रकाश शेळके, बापूसाहेब बडेकर आणि सहाय्यक अभियंता राजेंद्र पालवे यांना निखिल धंगेकर या आरोपीने शुक्रवारी रात्री कार्यालयात घुसून मारहाण केली होती.या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, मारहाण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून मारहाण करणाऱ्या आरोपींवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. महावितरण प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कर्मचाऱ्यांना कायम संरक्षण देण्यासाठी विचार करण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी महावितरणचे मंडल अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भराडे, उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड, अभियंता पालवे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ०७ तनपुरे
ओळी- ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाविरण कार्यालयात भेट देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.