मिनी लॉकडाऊनचे निर्बंध मागे घ्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:38+5:302021-04-09T04:22:38+5:30
अहमदनगर : कोरोनाचे संक्रमण वाढत असताना मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लादण्यात आलेले कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, ...

मिनी लॉकडाऊनचे निर्बंध मागे घ्यावेत
अहमदनगर : कोरोनाचे संक्रमण वाढत असताना मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लादण्यात आलेले कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
यावेळी भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, संघटन सरचिटणीस अॅड. विवेक नाईक, आदी उपस्थित होते. कठोर निर्बंध लादताना छोटे दुकानदार, घाऊक व्यापारी, केशकर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक होते. कारखाने चालू पण दुकाने बंद, ट्रान्सपोर्ट सुरु तर गॅरेज व स्पेअर पार्टची दुकाने बंद, कोर्ट व वकिलांचे ऑफिस सुरु परंतु टायपिंगची दुकाने बंद, कापड मिल सुरु पण कापड दुकाने बंद असे अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय एकमेकांशी निगडीत आहेत. त्यामुळे अशा सर्व छोट्या-मोठ्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. गरिबांची जीवन आणि अर्थकारण दोन्ही प्रभावित होणार नाही. कामगारांचा रोजगार, कर्जावरील व्याज, वीजबिल, दुकानभाडे, कर्ज हप्ते, सर्वप्रकारचे कर इत्यादी अनेक प्रकारच्या संकटाला व्यापारी व गोरगरिबांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडले आहे. शनिवारी व रविवारी पुकारण्यात आलेल्या संपूर्ण लॉकडाऊनला सर्वांची तयारी व सहमती होती. मात्र, पाच दिवस कठोर निर्बंध लावून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. सर्व दुकानदारांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.