प्रयोगशाळेत पाठवलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध १०० टक्के शुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:41 IST2025-02-19T17:40:38+5:302025-02-19T17:41:04+5:30
ग्रामीण भागातील गोठे, दूध संकलन केंद्रांना भेटी देऊन दुधाचे नमुने घेण्यात येतात.

प्रयोगशाळेत पाठवलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध १०० टक्के शुद्ध
अहिल्यानगरः जिल्ह्यातील विविध ठिकाणचे दुधाचे १९ नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, हे सर्व नमुने सदोष असल्याचे समोर आले आहे. आणखी चार नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
दूध भेसळीविरोधात मोहीम
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गोठे, दूध संकलन केंद्रांना भेटी देऊन दुधाचे नमुने घेण्यात येतात.
मागील महिनाभरात दुधाचे १९ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून, सर्व नमुने सदोष आहेत. उर्वरित आणखी ४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. संदीप इंगळे, सहायक आयुक्त
१९ नमुने तपासले
जिल्ह्यातील विविध ठिकाणचे दुधाचे १९ नमुने अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आले होते. नमुने तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. अन्न प्रशासनाने घेतलेले नमुने शुध्द होते.
नागरिकांना आवाहन
शहरासह जिल्ह्यात दुधात भेसळ होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क करावा. दुधाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दुधाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येतात. तपासणीत भेसळ आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे कुणी न घाबरता अन्न प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहायक आयुक्त इंगळे यांनी केले आहे.