भिंगार येथे अपघातात लष्करी जवान ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 13:26 IST2017-12-13T13:25:30+5:302017-12-13T13:26:03+5:30
नव्यानेच लष्करात भरती झालेल्या नितीनकुमार महेशचंद (वय २०) या जवानाचा बुधवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

भिंगार येथे अपघातात लष्करी जवान ठार
अहमदनगर : नव्यानेच लष्करात भरती झालेल्या नितीनकुमार महेशचंद (वय २०) या जवानाचा बुधवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
धावण्याच्या सरावासाठी भिंगार येथून जवानांची एक तुकडी चांदबिबी महालाकडे जात होती़ जवानांची तुकडी प्रियदर्शनी हायस्कूलजवळ महामार्गाने धावत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव इंडिका काने (एम. एच. १६, एटी. ३९९१) नितीन याला ठोकरले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ इतर जवानांनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान मिलिटरी गेटजवळ संबंधित कार चालकाला लष्करी जवानांनी थांबण्याची सुचना केली होती. मात्र, या सुचनेकडे दुर्लक्ष करीत संबंधीत कार चालकाने कार भरधाव वेगाने कार पळविली. पुढे काही वेळातच हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर कार चालक कार सोडून पळून गेला. त्यामुळे कार चालकाचे नाव समजू शकले नाही. तर अपघातग्रस्त कार भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अपघाताची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.