एमआयडीसी भागात तिघांवर चाकूहल्ला
By Admin | Updated: May 17, 2016 23:57 IST2016-05-17T23:57:35+5:302016-05-17T23:57:37+5:30
अहमदनगर : मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी तिघांवर चाकूने हल्ला केला.

एमआयडीसी भागात तिघांवर चाकूहल्ला
अहमदनगर : मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी तिघांवर चाकूने हल्ला केला. ही घटना एमआयडीसी परिसरातील अलाईन्स कंपनीसमोर रविवारी (दि. १५) रात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम श्रीरामवदन पटेल (मूळ रा. मध्यप्रदेश, हल्ली मुक्काम, एमआयडीसी) हा त्याच्या मित्रासह दवाखान्यात जात होता. यावेळी कोठे चालला आहात, अशी विचारणा करून मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी पटेल याच्या मित्रांना दमदाटी, शिविगाळ करून मारहाण केली. यावेळी शुभम पटेल याने मध्यस्थी केली असता त्याच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र, त्याने शिताफीने चाकूचे वार चुकविले. त्यानंतर तिघांनी बिपीनकुमार श्रीनिवास पटेल याच्या पोटात चाकूने वार केले. त्याच्यासह सोनाप्रसाद साहू आणि वसंत (पूर्ण नाव नाही) असे तिघे जखमी झाले. या प्रकरणी शुभम पटेल याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.