जामखेडकरांच्या पुण्याईने खासदार
By Admin | Updated: May 22, 2014 00:02 IST2014-05-21T23:51:56+5:302014-05-22T00:02:48+5:30
जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभेचे सलग पंधरा वर्षेे प्रतिनिधीत्व व जिल्हा बँकेचे संचालकपद जामखेडकरांच्या पुण्याईने मिळाले.
जामखेडकरांच्या पुण्याईने खासदार
जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभेचे सलग पंधरा वर्षेे प्रतिनिधीत्व व जिल्हा बँकेचे संचालकपद जामखेडकरांच्या पुण्याईने मिळाले. या परिचयावरच शिर्डी मतदारसंघातील जनतेने दिलेल्या प्रेमामुळे मी खासदार झालो, अशी प्रतिक्रिया शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार व जामखेडचे भूमिपूत्र सदाशिव लोखंडे यांनी दिली. जामखेड तालुक्यातील दिघोळ गावी देवदर्शनासाठी जात असताना त्यांचे जामखेड येथे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने तालुका विकास अधिकारी दहिकर यांनी सत्कार केला. यावेळी शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही त्यांचा सत्कार केला. जामखेडकरांच्या सत्काराने आपण भारावून गेलो, असे सांगून लोखंडे यांनी दिघोळकडे प्रयाण केले. जामखेडकरांच्यावतीने खा. लोखंडे यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक चंद्रकांत राळेभात यांनी सांगितले. यावेळी प्रसाद ढोकरीकर, शहाजीराजे भोसले, अंकुश उगले, नितीन हुलगुडे, काशीनाथ ओमासे तसेच युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)